नवऊद्योजकांसाठी काही महत्वाच्या टिप्स
१. नातेवाईक किंवा मित्र यांना शक्यतो व्यवसायात सहभागी करुन घेऊ नका.
२. कुणासाठीही शब्द टाकु नका, कुणाचीही खात्री देऊ नका किंवा कुणावरही तात्काळ विश्वास ठेऊ नका.
३. स्वप्रतिमा नेहमी स्वच्छ राहील याची काळजी घ्या.
४. ऊधारीचा व्यवहार टाळण्याचा प्रयत्न करा.
५. समाजसेवेसाठी व्यवसाय करायचा नसतो, व्यवसाय मोठा झाला की समाजसेवा आपोआपच होते.
६. व्यवसायात मनमिळाऊ स्वभावासोबतंच निष्ठुरता सुद्धा महत्वाची असते.
७. कर्मचाऱ्यांना जिव लावा पण त्यांना डोक्यावर बसवु नका.
८. गरज कधीही दाखवु नका, गरजवंताला नेहमीच लुबाडले जाते.
९. वेळप्रसंगी कठोर निर्णय घ्यायला कचरु नका.
१०. तुमच्या व्यवसायावर तुमचेच वर्चस्व असेल याची काळजी घ्या. व्यवसायाच्या मुख्य पदांवर मित्र नातेवाईक यांची नियुक्ती करणे टाळा.
११. कोणत्याही परिस्थितीत आधी व्यवसायाचा विचार करा.
१२. भावनेच्या भरात व्यवसायाला नुकसान होईल असे निर्णय घेऊ नका.
१३. व्यवसायावर मॅनेजर, सुपरवायजर नियुक्त असतील तर आर्थिक ताळेबंद वेळोवेळी स्वतः तपासा.
१४. व्यवसायातील महत्वाच्या निर्णयांची चर्चा सर्वांसमोर करु नका. व्यवसायातील गुप्तता काटेकारपणे पाळा.
१५. ऊद्योजकाने ऊद्योगाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यासारखे वागु नये. काम करावे,
कर्मचाऱ्यात मिसळावे, त्यांच्याशी गप्पा माराव्यात, त्यांना आपलेसे करावे
पण तुम्ही मालक आहात याची कर्मचाऱ्यांना जाणीव असलीच पाहीजे.
या टिप्स ऊद्योजकांसाठी आहेत, त्यामुळे याकडे कर्मचाऱ्याच्या नजरेतुन पाहु नये.
तुमची किंमत तुमच्या यशावर ठरते, म्हणुन व्यवसाय यशस्वी करणे हेत तुमचे अंतिम ऊद्दीष्ट असले पाहिजे
~