Tuesday 4 April 2017

- शेळीपालन एक सत्य -

गेल्या एक दड वर्षांत शेळीपालनाची लाट ( सुनामीच ) महाराष्ट्रात आली आहे. 5 ते 7 हजार रूपये खर्चून प्रशिक्षण घेतले जाऊ लागले शेळीपालन हे एक मोनलीसाच्या डोळ्यातील गुढ आहे. ते आजवर कुणालाही ऊलागडलेले नाही. अगदी हजारो वर्ष पारंपरिक पद्धतीने शेळी पाळनारांनाही याचं रहस्य अजुन पुर्णपणे ऊलगडलेल नाही ते 4 दिवसांच्या पुस्तकी प्रशिक्षणात कितपत ऊलगडलेल माहित नाही. कारण यशस्वी शेळीपालन हे पुस्तकावर ठरत नसून आपल्या मस्तकावर आणि आपार कष्टावर ठरते.
आफ्रीकन बोअर शेळी हा सुरूवातीला या सुनामीचा केंद्रबींदू होता. फसव्या यशोगाथा, यशोगाथेत सांगितलेले लाखोचं फसवे आकडे. या यशोगाथा नामक फसव्या मार्केटींग प्रकाराला पारंपरिक शेळीपालक वगळता बहुतांशी सुशिक्षित वर्गच बळी पडला 2000 ते 4000 रूपये किलोने खरेदी केलेली बोअर शेळी, बोकड स्थानिक बाजारपेठेत प्रत्यक्षात जिंवत 400 रूपये किलो दरानेही कोनी घेईना अनेकांनी 10 लाख 15 लाख गुंतवणूक करून शेळ्या खरेदी केल्या. महागडे गोठे बांधले काहिनी चांगले व्यवस्थापन केले परंतु मागणी आणि अपेक्षित दर न भेटल्याणे तोट्यात गेले काही व्यवस्थापनात कमी पडले वर्षभरात नवीन गोट फार्मर लोकांना टोप्या घालण्याचा हा धंदा कही जागरूक शेळी पालकांच्या जागरूकतेमुळे आपोआपच बंद पडत आलाय.
नंतर ईद मार्केटच्या नावाखाली, रंगी बेरंगी राजस्थानी शेळ्या मार्केटमध्ये आल्या आणी येत आहेत. परंतु त्यांना महाराष्ट्रातील हवामान न मानवल्याने त्या जास्त प्रमाणात तग धरू शकल्या नाहीत. या सर्वाच्या तुलनेत महाराष्ट्रातील स्थानिक शेळी कधीही गुणवत्तेच्या आणी उत्पादनाच्या बाबतीत फायदेशीर ठरत आहे. . . . . .
1) पुस्तकी ज्ञान
2) फसव्या यशोगाथांना बळी पडुन आरंभशुरपणा
3) मघगडे गोठे बांधने.
4) ऊंटावरून शेळ्या हाकणे ( स्व ता लक्ष न घालणे. )
5) विकतचा महागडा चारा.
6)आपल्याकडील उपलब्ध चार्यावर गुजारान करणार्या स्थानिक जाती न ठेवणे,
7) तयार माल वेळीच न विकने.
8) कारण नसताना जाती शोधत बसणे.
9) अनुदान लाटन्यासाठी शेळीपालन करणे.
शेळी हा लहरी प्राणी असलयाणे चारा आलटून पालटून द्यावा.
प्रत्येक ठेच खाऊन पडनारा माणूस हा आपल्याला किती लागलय हे न पाहता आपल्याला पडताना कोणी पाहीलतार नाही ना हे आधी बघतो. . . .
तसेच अपयशाची टेच लागुन पडलेले आपण नेमकी कुठे ठेच खाऊन पडलोय हे सांगत नाहीत. . . . .
या सगळ्याचा बारकाईने अभ्यास केल्यासशेळीपालन नक्की यशस्वी ठरेल. . . .

No comments:

Post a Comment

Job

CALL 9011447702 Saiti Internet Online Destination from filing center  Vitthal wadi nandurkhi road shirdi