*नेटवर्क मार्केटींग म्हणजे काय?*
यासाठी आपण मार्केटचे २
प्रकार पाहुयात. कारण यातील एक पद्धत सर्वांना माहीत आहे. आणि दुसरी पद्धत
नेटवर्क मार्केटींग पद्धत कशी आहे हे लक्षात येईल. त्यामुळे दोन्ही फरक
लक्षात आल्यावर त्यावर आपण काम करायचे की नाही ते ठरवू शकता.
*पद्धत १:- ट्रेडीशनल मार्केट:-* ट्रेडीशनल मार्केट पद्धत ही सर्वांना
प्रचलित आहे. परंतू या पद्धतीत विक्रीतील नफा कसा व कोणत्या पद्धतीने वाटप
होतो. हे ब-याच ग्राहकांना माहीत नाही व हे समजणे जरुरी आहे. तर यामध्ये
उत्पादक कंपनी आपले उत्पादन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी *कंपनी ->
डिस्ट्रीब्युटर -> होलसेलर -> दुकानदार -> ग्राहक* या पद्धतीने
साखळी निर्माण करते. व सदर उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचते. या पद्धतीत लोक
स्वतः येवून दुकानातून खरेदी करतात. आणि लोकांनी केलेल्या खरेदीवर झालेला
नफा या साखळी पद्धतीत वाटप होतात. म्हणून ट्रेडीशनल मार्केट सुद्धा
साखळीचाच भाग आहे. मात्र या पद्धतीत माल, जागा इ. साठी भरपूर भांडवल घालावे
लागते. हा उद्योग पारंपारिक पद्धतीत मोडला जातो.
*पद्धत २:-
नेटवर्क मार्केट:-* नेटवर्क मार्केटींगची पद्धत हि ब-याच लोकांना माहीत
नाही. (त्यामुळे गैरसमज होऊ शकतात. म्हणून समजून घ्या.) यामध्ये उत्पादक
कंपनी आपले उत्पादन हे एका ग्राहकामार्फत दुस-या ग्राहकास दुस-या
ग्राहकाकडून तिस-या ग्राहकास अशा पद्धतीने साखळी निर्माण करते व विक्री
करते. म्हणजे *कंपनी -> ग्राहक -> ग्राहक -> ग्राहक* या पद्धतीने
आपले उत्पादन कंपनी थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवत असते. आणि जसे
ट्रेडीशनल मधल्या साखळीत पैसा वाटप होतो. तसा या पद्धतीत आलेला नफा संबधीत
ग्राहकात वाटप हाेतो. या पद्धतीत जागा, माल यासाठी भांडवलाची गरज नसते. व
वेळेचेही बंधन नसते. म्हणून हा व्यवसाय असून पार्टटाईम जॉब म्हणूनही आपण
करु शकता. यासाठी आपले ग्राहक हेच आपले भांडवल. त्यामुळे ही पद्धत आधुनिक
पद्धत (२१ व्या शतकातील व्यापाराची पद्धत) मानली जाते.
थोडक्यात उत्पादन पोहोचवण्यासाठी साखळीचा वापर दोन्ही ठिकाणी करावा लागतो. व
त्यामुळे त्यासाठी जो नफा मिळतो तो या दोन पद्धतीमध्ये अशा प्रकारे वाटला
जातो.
आता एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की, दोन्ही
पद्धतीत कंपन्या ह्या उत्पादन करतात. व ग्राहकांपर्यंत MRP किंमतीत विक्री
करतात.
No comments:
Post a Comment